Weather Update: पुढील 5 दिवस या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

By Bhimraj Pikwane

Published on:

Weather Update Maharashtra

Weather Update: उष्णतेच्या लाटेने नागरिक चिंतेत असतानाच, पूर्व विदर्भात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे फळबागा, पशुधन आणि घरांचे नुकसान झाले. त्यामुळे राज्यात एकाच वेळी संमिश्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंगळवारीही राज्यभरातील अनेक शहरांमध्ये तापमानाने 40 अंशांच्या पुढे गेले. विदर्भातही तापमान 44 अंशांवर पोहोचले. ज्या शहरांमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान झाले, तेथे तापमानामुळे दुपारच्या सुमारास मतदारांची संख्या कमी झाली. दरम्यान, पूर्व विदर्भात गारपीट झाली.

वादळामुळे नागपूर शहरात झाडे उन्मळून पडली, वीज तारा तुटल्या आणि डबके उडून गेले. उत्तर आणि पूर्व नागपुरातही गारा पडल्या. भिवापूर तालुक्यात बैलजोडी तर रामटेक तालुक्यात वीज पडून बैलाचा मृत्यू झाला.

सायंकाळच्या पावसाने दिवसभराच्या उन्हात दिलासा दिला. याशिवाय गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातही सोमवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. एटापल्ली व तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. वादळामुळे पिकांचेही नुकसान झाले. चंद्रपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.

Medical Officer Recruitment: वैद्यकीय अधिकारी पदांची इतक्या जागेसाठी मोठी भरती, आत्ताच अर्ज करा, सुवर्ण संधी

Weather Update Maharashtra: पुढील पाच दिवस अवकाळी

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात येत्या पाच दिवसांत 11 मेपर्यंत अवकाळी पाऊस आणि वादळ सुरू राहणार आहे. मंगळवारी नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी आणि अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Bhimraj Pikwane

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

2 thoughts on “Weather Update: पुढील 5 दिवस या भागात अवकाळी पावसाचा अंदाज”

Leave a Comment