Rte Admission Maharashtra : मोठ्या प्रतीक्षेनंतर 9 लाख जागेसाठी आरटीईचे प्रवेश सुरू, असा भरा अचूक अर्ज

By Bhimraj Pikwane

Published on:

Rte Admission Maharashtra

Rte Admission Maharashtra : जे पालक RTE (Right to Education Act) प्रवेश प्रक्रियेबद्दल चिंतेत होते ते आता 2 महिन्यांनंतर अर्ज सुरु झाले आहेत. बहुप्रतीक्षित नावनोंदणी अखेर आली आहे आणि विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील 75,000 हून अधिक शाळांनी शिक्षण हक्क कायदा 2009 (Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. आरटीई प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या वर्षीचा नवीन नियम Rte Admission Maharashtra

मात्र शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल केला आहे. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा सार्वजनिक शाळा नसल्यास, विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत असलेल्या स्वयम अर्थसाहित शाळेत प्रवेश दिला जाईल.

दरम्यान, (Rte Admission) आता ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून सध्या राज्यातील ७५,९७४ शाळांमध्ये आरटीईद्वारे प्रवेश उपलब्ध आहेत. या शाळांमध्ये  9 लाख 72 हजार 823 जागा रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यातील 5,153 शाळांमध्ये 77,927 जागा रिक्त आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2 हजार 836 शाळांमध्ये 36 हजार 147 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

RTE अर्ज योग्यरित्या भरा; शिक्षण विभागाचे आवाहन

त्यांच्या मुलांसाठी आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरताना, पालकांनी फक्त एक अर्ज पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन लॉटरीत चुकीचे किंवा डुप्लिकेट अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे राज्याच्या शिक्षण विभागाने पालकांना कळवले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करून विविध विभाग आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

RTE ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

राज्यात प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार, असा सवाल पालकांकडून केला जात आहे. अखेर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया जाहीर केली. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहिती मिळविण्यासाठी पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाइटला भेट देण्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले आहे.

Bhimraj Pikwane

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.