Birsa Munda Krushi Kranti Yojana: बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अर्ज करा आणि विहीर बांधण्यासाठी 2.50 लाख रुपय अनुदान मिळवा, वाचा सविस्तर माहिती

By Bhimraj Pikwane

Published on:

Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana: जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा पंचायत समितीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2023-24 या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात सुमारे 678 विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. इतर सर्व जिल्ह्यात सध्या अर्ज करण्यासाठी सुरु आहेत. विविध कृषी पिकांच्या उत्पादनासाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. विहीर हा सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु विहिरी बांधण्याचा खर्च लाखोंच्या घरात जात असल्याने शेतकरी स्वतः विहिरी बांधु शकत नाहीत. त्यामुळे शासनाने विहीर बांधकामासाठी अनुदान मंजूर केले.

अर्ज कसा करावा

Birsa Munda Krushi Kranti Yojana Online Apply: शेतकरी बांधवानी आपला अर्ज https://mahadbt.maharastr a.gov.in/Farmer/login/login या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्ज सबमिट करताना, लाभार्थ्यांनी आवश्यक बाबी काळजीपूर्वक निवडाव्यात आणि पोर्टलवर अर्ज भरावा. तुमच्याकडे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर नसल्यास, कृपया तुमच्या अर्जावर तुमच्या जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर द्या. या क्रमांकावर निवड झाल्यावर संदेश प्राप्त होतात.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनु, जाती, नवबौद्ध आणि आदिवासी शेतकरी असावेत.
  • त्याच्याकडे 7/12 जमीन असावी.
  • जातीकडे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
  • लाभार्थ्याकडे स्वतःचे आधार कार्ड
  • बँक खाते असणे आवश्यक आहे
  • बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

अडीच लाखात विहीर कशी बांधणार ?

या योजनेंतर्गत विहिरींच्या बांधकामासाठी केवळ 2.50 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मात्र सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे 2.50 लाखात विहीर बांधणे कठीण होणार आहे. रोहयो (रोजगार हमी योजना) मंजूर विहिरी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे: मागणी वाढत आहे. त्यासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.

हा देखील लाभ होणार?

समाज कल्याण आणि आदिवासी विकास मंत्रालय या कार्यक्रमासाठी निधी देते. सिंचन विहीर 2,50000 रु. , जुन्या विहिरीचे दुरुस्ती साठी 50 हजार रुपये, बोअर घेण्याकरिता रुपये 20,000, वीज जोडणी रु. 10,000, पंप संच रु. 20,000, सौर कृषी पंप रु. 30,000, शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. याचा शेतकरी बांधवानी नक्की लाभ घ्यावा.

Birsa Munda Krushi Kranti Yojana

Birsa Munda Krushi Kranti Yojana हि योजना mahadbt पोर्टलवर सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. अनुदान वितरणाच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन केल्या जातात. शेतकऱ्यांनी तपशिलासाठी पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान कृषी विभाग मार्फत करण्यात आले आहे.

Bhimraj Pikwane

I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of Help In Marathi. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment